Ad will apear here
Next
शरद पवार यांच्या जन्मदिनानिमित्त ‘लेणे प्रतिभेचे’
बाबूजी, गदिमा आणि पुलंच्या गीतांचा विशेष कार्यक्रम
पुणे : मराठी माणसाच्या मनात आपली एक खास जागा निर्माण केलेले श्रेष्ठ संगीतकार सुधीर फडके, गीतकार ग. दि. माडगूळकर आणि लेखक पु. ल. देशपांडे या त्रिमूर्तीच्या अवीट गोडीच्या गीतांचा आनंद घेण्याची संधी पुणेकरांना ‘लेणे प्रतिभेचे’ या कार्यक्रमाद्वारे मिळणार आहे. बुधवारी, १२ डिसेंबर रोजी सायंकाळी साडे चार वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे हा कार्यक्रम होणार असून, तो सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक शरद पवार यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने अशोक राठी आणि मनाली भिलारे यांच्या पुढाकाराने ‘लेणे प्रतिभेचे’ हा नृत्यसंगीताचा कार्यक्रम आणि सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात ज्येष्ठ व्हायोलिन वादक प्रभाकर जोग आणि ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते त्यांना गौरवण्यात येणार आहे.    

सुधीर फडके, ग. दि. माडगूळकर आणि पु. ल. देशपांडे यांनी अजरामर केलेली गीते आणि त्यावरील नृत्ये ‘लेणे प्रतिभेचे’ या कार्यक्रमात सादर केली जाणार आहेत. 

या कार्यक्रमाची निर्मिती व संकल्पना सुनिल महाजन यांची आहे. मुलाखतकार सुधीर गाडगीळ हे प्रभाकर जोग आणि श्रीकांत मोघे यांची मुलाखत घेणार आहेत. जोग आणि मोघे यांच्या सुधीर फडके, गदिमा आणि पुलंविषयी काय आठवणी आहेत ते या वेळी रसिकांना जाणून घेता येणार आहे.

कार्यक्रमाविषयी :
शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ‘लेणे प्रतिभेचे’ 
स्थळ : बालगंधर्व रंगमंदिर
दिवस व वेळ : बुधवार, १२ डिसेंबर, सायंकाळी साडे चार वाजता
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/EZUJBV
Similar Posts
सुधीर फडके, गदिमा आणि पुलंच्या आठवणींना उजाळा पुणे : ज्येष्ठ व्हायोलिनवादक प्रभाकर जोग आणि ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांनी ज्येष्ठ संगीतकार सुधीर फडके, ज्येष्ठ कवी व गीतकार ग. दि. माडगूळकर आणि ज्येष्ठ लेखक पु. ल. देशपांडे यांच्या आठवणींना उजाळा दिला आणि त्यांच्यामुळेच आपण घडलो अशी नम्र भावनाही व्यक्त केली. निमित्त होते अशोक राठी आणि मनाली भिलारे
वुमन्स आर्टिस्ट ग्रुपतर्फे चित्रशिल्प प्रदर्शन पुणे : महाराष्ट्राचे वाल्मिकी ग. दि. माडगूळकर, ज्येष्ठ संगीतकार, गायक सुधीर फडके आणि महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ‘वुमन्स आर्टिस्ट ग्रुप’तर्फे चित्रशिल्प प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.  ‘यामध्ये पुलं, गदिमा आणि बाबूजी यांची महिला चित्रकारांनी
पुणेकरांनी अनुभवले ‘लेणे प्रतिभेचे’ पुणे : अख्ख्या महाराष्ट्रावर गारूड करणारी तीन व्यक्तिमत्त्वे अर्थात संगीतकार सुधीर फडके, गीतकार ग. दि. माडगूळकर आणि लेखक पु. ल. देशपांडे. या तीन दिग्गजांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून ‘संवाद, पुणे,’ संस्कृती प्रतिष्ठान आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ यांच्यातर्फे ‘लेणे प्रतिभेचे’ या अनोख्या कार्यक्रमाचे नुकतेच पुण्यात आयोजन करण्यात आले होते
गदिमा, पुलं आणि बाबूजींच्या आठवणींनी रंगली दिवाळी पहाट पुणे : ग. दि. माडगुळकर (गदिमा) यांच्या शब्दांची लय, पु. ल. देशपांडेंचा (पुलं) अजरामर विनोद आणि सुधीर फडके (बाबूजी) यांच्या अवीट चाली यांच्या साथीने पुणेकरांनी सुरेल पहाट अनुभवली. निमित्त होते ते त्रिदल, पुण्यभूषण फाउंडेशन, लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३२३४ डी २ आणि कोहिनूर ग्रुप यांच्या वतीने आयोजित केलेल्या ‘तिहाई’ या दिवाळी पहाट कार्यक्रमाचे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language